Friday, July 27, 2018

आकर्षणाचा सिद्धांत आणि त्याची परिणामकता

आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे  काय ह्याची एका वाक्यात व्याख्या जर बघितली तर सारखा मिळे सारख्याशी म्हणजेच एखाद्या  प्रकारचे विचार तशाच प्रकारच्या सम परिस्थितीला आकर्षित करतात. आकर्षित करतात म्हणजेच आज श्रीमंत  व्हायचा विचार निर्माण झाला तर उद्या आपण श्रीमंत होऊ असं नाही किंवा आज आत्महत्येचा विचार आला तर उद्या आत्महत्या करू असंही नाही. कुठलीही गोष्ट घटीत व्हायला तुमच्या विचार प्रक्रियेत कुठला भाव ( Emotion )आहे आणि त्याची तीव्रता किती आहे ह्यावर तुम्हाला मिळणारा परिणाम अवलंबून असतो. जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा आवेशात विचार करतो तेच ती गोष्ट जास्त लवकर घटीत  होते कारण जेव्हा आवेश येतो तेव्हा त्या बरोबर सकारात्मक किंवा नकारात्मक भावाची तीव्रता हि मोठ्या प्रमाणात असते,  कुठल्याही कृतीच्या आधी नेहमी विचार असतो. विचारांशिवाय कुठलीही कृती होत नाही मग तो विचार बरोबर होता कि चुकीचा होता हे परिणाम बघितल्यावरच समजतं. 

शास्त्रज्ञाच्या मते  मनुष्य एका दिवसात  अंदाजे ६०,००० विचार करतो आणि गंभीर बाब  म्हणजे त्यातले ९०%  विचार हे नकारात्मक असतात.  आपल्या व्यक्तिगत जीवनात होणारी कुठलीही घटना हि आपल्या पूर्वी वारंवार केलेल्या विचारांचा परिणाम असतो. व्यक्तिगत जीवनात होणारी घटना प्रामुख्याने लक्ष ( Attention ), उद्देश   ( Intention ) आणि भाव ( Emotion ) ह्या तिन्ही गोष्टीची सांगड घालून आपल्याकडे आकर्षित होते. ह्या तिन्ही  मध्ये भाव (Emotion ) हि अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे. कुठल्या विचारात भावाची ( Emotions ) ची तीव्रता मोठ्या प्रमाणात नसेल तर कृती परिणामकारक  होणार नाही.     

No comments:

Post a Comment