Tuesday, July 31, 2018

स्वयंप्रतिमा



स्वयंप्रतिमा म्हणजे आपण स्वतःला कशा  प्रकारे बघतो आपल्या नजरेत आपली प्रतिमा काय आहे किंवा दुसऱ्यांनी आपल्या बद्दल काय प्रतिमा ठेवावी असं आपल्याला वाटणे. आपण स्वतः ला  आरशात बघतो ती आपली शारीरिक ठेवणाची प्रतिमा असते आपण ह्याच्या बद्दल बोलत नाही आहोत. आपली स्वयं प्रतिमा बनते आपल्या काही गोष्टींवरच्या  विश्वासावरून.   आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व हे आपण ठेवलेल्या आपल्या स्वयं प्रतिमेवरुन ठरत असत. एवढेच नाही तर आपण भविष्यात कोण होऊ हे   आपल्या स्वयंप्रतिमे वरून ठरतं.  उदा: आपल्याला मनात नुसतं  वाटत असेल कि आपण एक उद्योगपती व्हावं किंवा एकाद्या मोठ्या कंपनी मध्ये मोठ्या पदावर जावं , पण हे नुसतं वाटून उपयोग  नसतो  तुमच्या मनातल्या स्वयंप्रतिमेमध्ये तुम्ही त्या पदावर स्वतःला बघू शकत नसाल तर तुम्ही त्या पदा पर्यंत पोहचणार नाही आणि यदा कदाचित पोहचलात तरी तिकडे टिकू शकणार नाहीत हे निश्चित  कारण आपली स्वयं प्रतिमा आपला आत्मविश्वास दर्शवते. प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्या चालण्या वरून चेहऱ्यावरील हाव भावावरून  त्या व्यक्तीची स्वतः बद्दलची प्रतिमा समोरचा माणूस समजू शकतो.  अर्थात व्यक्तिमत्व विकासात व्यक्तीची स्वयंप्रतिमा मोलाची असते. आपल्या  स्वयंप्रतिमी मध्ये बिघाड असेल तर यशप्राप्ती पासून आपण खूप दूर आहोत असं समजाय ला हरकत नाही.   

No comments:

Post a Comment