Friday, July 3, 2020

विश्वास आणि धारणा यांचा जीवनाशी संबंध



आपल्या संतांनी सांगितलं आहे की विश्वास अवघ्या माझारी सर्व बाजुंनी श्रेष्ठ आहे . म्हणजेच विश्वासाला एक शक्ती म्हणून सांगण्यात आले आहे. हा विश्वास नक्की काय आहे ? एखाद्या गोष्टी बद्दल निश्चितअसणे हा विश्वास आहे. एखाद्या गोष्टी बद्दल आत्मविश्वास असणे किंवा एखादी धारणा बनवणे हा सुद्धा विश्वासच आहे.
हा विश्वास किंवा ही धारणा कशी बनते ? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की बरेचशा धारणा आपण गेल्या जन्मातून ह्या जन्म ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की बरेचशा धारणा आपण गेल्या जन्मातून ह्या जन्मात आपल्या बरोबर घेऊन येत असतो. त्या शिवाय आपल्या धारणा ह्या आपल्या भोवतालच्या परिस्थतीतीनुसार तयार होत असतात. आपल्या ह्या धारणा बऱ्याच गोष्टी मध्ये दिसूशकतात जसे कि एखाद्या व्यक्ती बद्दल , एखाद्या विशिष्ट समाज बदल एखाद्या जागे बद्दल , किंवा एखाद्या देशा बदल सुद्धा. आपला बालपणीचा काळ हा आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचा ठरतो कारण सुरुवातीच्या काळात आपल्या समोर घडणाऱ्या गोष्टी परिस्थिती ह्यातून बनणारे चुकीचे धारणा ,विश्वास हे आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम करत असतात.
आपली जर धारणा असेल कि मला झालेल्या आजारावर जगात कुठे हि औषध नाही आणि हा आजार असाच राहणार तर जगातलं कुठलंही औषधाचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे  विमानातील ऑटो पायलट मोड वर विमात नेले असता नंतर कितीही वेग वाढवा अथवा जमिनीपासूनची उंची कमी किंवा जास्त करा ते विमान परत तोच वेग आणि उंचीवर येत जी आपण त्यात मांडणी करून ठेवली आहे त्याच प्रमाणे आपल्या तब्येती बद्दलच्या आपल्या धारणा ह्या जर नकारात्मक असतील तर उपचार बदलले तरी काही दिवसांच्या  चांगल्या बदला नंतरती व्यक्ती पुन्हा त्याच पूर्व परिथितीत येते.

आपल्याला आपले विश्वास आणि धारणा यांचं व्यवस्थित विश्लेषण करायला हवे आणि जर एखादी  धारणा चुकीची असेल तर ती धारणा काढून टाकावी. 

No comments:

Post a Comment